डॉ. राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचा शुभारंभ

कोल्हापूर : महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ प्रदेशउपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत नदीवेस गावभाग येथील मरगुबाई मंदिर येथून भव्य पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी आशीर्वाद दिला. या पदयात्रेने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण केले.

 

 

पदयात्रेला प्रारंभ करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. पदयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनीराहुल आवडेंचे स्वागत करून औक्षण केले. ज्यामुळे या उपक्रमाला आणखी रंगत आली.

पदयात्रे दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आवाडे म्हणाले, आपल्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल आणि कार्यकाळात त्यांनी केलेल्या प्रगतीच्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आह्वान केले की, ते स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावेत आणि प्रत्येक मतदाराशी संवाद साधावा.

या भव्य पदयात्रेमुळे स्थानिक स्तरावर जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महायुतीच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि नागरिकांच्या समर्थनामुळे या पदयात्रेने स्थानिक राजकारणात नवीन ऊर्जा भरली आहे.

यावेळी भाजप चे प्रमुख पदाधिकारी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते नागरिक,महिला व बूथ कमिटी मेम्बर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते

🤙 8080365706