कोल्हापूर उत्तर मध्ये धनुष्यबाण पुन्हा एकदा निवडून आणू ; महायुतीच्या नेत्यांचा निर्धार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची शिवसेना-महायुतीची अधिकृत उमेदवारी राजेश क्षीरसागर यांना जाहीर झाली आहे. यानिमित्त महायुतीच्या सर्व मित्रपक्षांची पत्रकार परिषद संपन्न झाली.

 

 

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या प्रक्रियेमध्ये प्रलंबित असलेली कोल्हापूर उत्तर विधानसभेची उमेदवारी राजेशजी क्षीरसागर यांना जाहीर झाले आहे. याबद्दल ल्हासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी महाडिक म्हणाले , भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदाधिकारी म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन एक दिलाने व एकजुटीने प्रचार करू आणि कोल्हापूर उत्तर मध्ये धनुष्यबाण पुन्हा एकदा निवडून आणू असा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केला.

यावेळी राजेश क्षीरसागर, सत्यजित नाना कदम, कृष्णराज महाडिक,आदिल फरास,महेश जाधव, विजय जाधव, . राहुल चिकोडे, यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706