कागल: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत अशातच समरजीत घाटगे गटाला सुळकूड मध्ये खिंडार पडले आहे.
सुळकूड शहरातील समरजीत घाटगे गटातील शाहू कृषी खरेदी विक्री संघाचे संचालक भीमगोंडा पाटील, विद्यमान सरपंच अर्चना सचिन परीट, माजी उपसरपंच शरद धोंडीराम धुळघोडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.