डॉ राहुल आवडेंचा ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील मोठे तळे येथे डॉ. राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. डॉ राहुल आवाडे ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या समस्या अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या चर्चेतून नव्या दृष्टिकोनासह समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय शोधण्याचे प्रयत्न यातून करत आहेत. नागरिकांशी थेट संवाद साधताना आम्हाला केवळ शिकण्याची संधी मिळाली नाही,तर समाजाच्या गरजा आणि अपेक्षांची अधिक स्पष्ट समजही निर्माण झाली आहे. असे मत राहुल आवाडे आणि मांडले.

 

 

तसेच आजपर्यंत केलेल्या कामांच्या बद्दल नागरिकांचे महत्त्व, प्रतिक्रिया,आवाडे यांनी जाणून घेतल्या आणि त्यांच्या सूचनामुळे पुढील कामाला दिशा मिळाली आहे असे सांगत आपल्या विश्वासाने आम्हाला  ऊर्जा मिळते आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहून याचा आम्हाला जोड विश्वास आहे असे राहुल आवाडे यांनी नागरिकांना सांगितले.

यावेळी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह मोठेतळे परिसरातील जेष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.