इचलकरंजी येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री देशपांडे इचलकरंजी विधानसभेच्या प्रभारी आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे आमदार प्रकाश आवाडे यांचे स्वागत करण्यात आले.

 

 

यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष (पुर्व), राजवर्धन नाईक निंबाळकर शहराध्यक्ष बाई अमृतमामा भोसले, सं. गां. नि. यो. समिती अध्यक्ष अनिल डाळ्या, सरचिटणीस राजेश राजपूते, बाळकृष्ण तोतला, मिश्रीलाल जाजू, महिला अध्यक्ष अश्विनी कुबडगे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड ,प्रसाद खोबरे, प्रकाश दत्तवाडे ,बाळासाहेब कलागते, तानाजी पोवार, विजया पाटील ,धोंडीराम जावळे, भाजपचे नगरसेवक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.