ऐनवाडी येथील कार्यकर्त्यांचा विनय कोरेंच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

कोल्हापूर: ऐनवाडी(ता.शाहूवाडी)येथील शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांनी विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

शांताराम बाबु शेवाळे, केशव सुतार, दिलीप व्हावळे, बापू कांबळे, सखाराम शिंदे, शंकर भाबळे, यशवंत सुतार यांच्यासह शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेची माजी सभापती सर्जेराव पाटील, युवराज बाबा काटकर आदी मान्यवर उपस्थित होते