चंद्रदीप नरकेंचा सांगरूळ येथे कार्यकर्ता मेळावा

कोल्हापूर: सांगरूळ जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघातील सध्याचे चित्र बदलण्यासाठी सर्वांची एकजूट पाहून उत्साह अजून वाढला. मी आमदार असताना केलेली शेकडो कोटींची कामे आणि आता आमदार नसताना केलायली कोट्यावधींची कामे, ही कामेच आपल्याला लोकांसमोर घेऊन जायचे आहे.

 

 

आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावरच, प्रचार करून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. यासोबतच निवडणुकांच्या बाबतीत विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी सांगरूळ जिल्हा परिषद मतदार संघ कार्यक्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, महिला वर्ग, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545