प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते भुदरगड तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शुभारंभ

कोल्हापूर: मौजे पळशिवणे, ता. भुदरगड येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शुभारंभ कार्यक्रम प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते उत्साहात संपन्न झाले.

 

यावेळी, प्रकाश आबिटकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले,शेतकऱ्यांच्या विकासापासून पाणीपुरवठा, रस्ते, आणि शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी केलेले हे काम गावाच्या विकासासाठी एक मोठं पाऊल ठरले आहे.
ग्रामपंचायत, रोजगार हमी, अंगणवाडी, शाळा, मंदिरे अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि कामांची सुरुवात या कार्यक्रमात करण्यात आली. या सगळ्या विकासकामांनी पळशिवणे आणि आसपासच्या गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल.
गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीच्या दिशेने उठलेले हे पाऊल नक्कीच सर्वांना पुढे घेऊन जाणारे ठरेल..