चंद्रदीप नरकेंचा कळे येथे कार्यकर्ता मेळावा

कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांनी कळे जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात, कार्यकर्ता मेळावा घेतला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नरके म्हणाले, “मी आमदार असताना केलेली शेकडो कोटींची कामे आणि आता आमदार नसताना केलेली कोट्यावधींची कामे, ही कामेच आपल्याला लोकांसमोर घेऊन जायची आहेत. आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावरच, प्रचार करून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. यासोबतच निवडणुकांच्या बाबतीत विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.”

 

 

यावेळी कळे जिल्हापरिषद मतदारसंघ कार्यक्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, महिला वर्ग, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.