चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत मरळी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर : मरळी (ता. पन्हाळा) येथील माऊली दूध संस्थेचे सर्व पदाधिकारी, मा.डे.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी सदस्य आणि कार्यकर्ते यांनी चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पुष्पगुच्छ देऊन चंद्रदीप नरके यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सतत होत असणाऱ्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून पक्षावर आणि माझ्यावर लोक दाखवत असणारा विश्वास नेहमीच सार्थ ठेऊ.असा विश्वास चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला.

 

 

यावेळी अविनाश गुरव, विजय डवरी, बाजीराव पाटील, शिवाजी पवार, अनिल डवरी, गणपती कांबळे, नामदेव डवरी, शिवाजी दि. पाटील, महादेव पाटील, बाबुराव गुरव, सदाशिव पाटील, पांडुरंग पवार, तुकाराम रोहिले, बाबुराव डवरी, भैरवनाथ डवरी, किसन डवरी, सुवर्णा चौगुले, अलका रोहिले, हर्षद पाटील, अनिकेत गुरव, विश्वनाथ डवरी, नंदकुमार पाटील, रामचंद्र पवार, विष्णुपंत पवार, सतीश दांगट, कृष्णात ज्ञानू कांबळे, धोंडीराम कांबळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.