कोल्हापूर (युवराज राऊत)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस दल ॲक्शन मोडवर आले असून आज दसरा चौकातील शाहू स्मारक हॉल मध्ये बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या.

यावेळी आचारसंहिता व होणाऱ्या निवडणुका या विषयावर काय करावे व काय करू नये या गोष्टींचे मार्गदर्शन देण्यात आले. हे मार्गदर्शन पोलिस दलाचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिले. बैठकीत कोल्हापूर शहरातील पोलिस दलाचे 17दुय्यम अधिकारी, 210 पोलिस कॉन्स्टेबल, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस हजर होते.
यावेळी लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पोवार, जुनाराजवाड्याचे संजीव झाडे,सुजित चव्हाण, शाहुपुरीचे अजय शिंदकर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अनिल तनपुरे ,लक्ष्मीपुरी चे पोलिस उप निरीक्षक भगवान गिरी उपस्थित होते.
