निलेश लंके कोल्हापूर दौऱ्यावर ; राहुल पाटील यांची भेट घेतली

कोल्हापूर : स्व. पी. एन. पाटील साहेबांच्या निधनानंतर, खासदार निलेश लंके यांचे बंधू, दीपक लंके, राहुल पी.एन. पाटील यांना भेटण्यासाठी आले. त्यानंतर, खासदार निलेश लंके आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना थेट राहुल पी.एन. पाटील यांच्या घरी भेटले. या भेटीदरम्यान, निलेश लंके यांनी स्व. पी. एन. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

 

ते म्हणाले की, मुंबईतील अधिवेशनाच्या वेळी स्व. पी. एन. पाटील नेहमीच युवा आमदारांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देत असत. त्यांच्या सहवासात त्यांनी जेवणाच्या सवयींपासून ते त्यांच्या मनमिळावू स्वभावापर्यंत अनेक खास आठवणी व्यक्त केल्या.

आजही अनेकांच्या मनात स्व. पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाने आणि विचारांनी प्रेरित झालेल्या असंख्य लोकांना त्यांच्या उणीव जाणवत आहे.याशिवाय, या भेटीत काही महत्त्वाच्या राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि विचारपूसही केली.