कोल्हापूर: भाजपा कोल्हापूरच्या वतीने चंदगड येथे जय जवान, जय किसान या महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते वीर माता, वीर पत्नी, वीर योद्धा यांचा सन्मान तसेच उत्कृष्ट व प्रगतशील शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

यावेळी धनंजय महाडिक यांनी आपल्या भारत भूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना अभिवादन केले व शेतकरी बांधवांशी संवाद साधला. जय जवान, जय किसान हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘जय विज्ञान, जय अनुसंधान’ असा पुढे नेण्यात येत आहे.
केंद्र सरकारने माजी सैनिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. राज्यातील महायुती सरकारने बळीराजा मोफत वीज योजना राबवून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. भविष्यकाळात ही केंद्र व राज्य सरकार शेतकरी व माजी सैनिकांच्या हितासाठी कार्य करत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी भरमू अण्णा पाटील, संग्रामसिंह कुपेकर, शिवाजी पाटील, विठ्ठल महाराज पंढरपूर, भगवान गिरी महाराज, शांताराम बापू, सचिन बल्लाळे, सांतवणेकर , ज्योती पाटील, दीपक पाटील, मायाप्पा पाटील, अजित वण्याळकर, पारूअक्का , मा. मनीषा शिवणेकर, मा. मोहिनी पाटील, अनिता चौगुले, जयंत चांदेकर, यशवंत घाऊसकर, कुमार पाटील, .उदयसिंह सरदेसाई यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
