कन्या शाळा कुंभोज येथे आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते कंपाउंड कामाचे शुभारंभ

कुंभोज:आमदार राजूबाबा आवळे यांच्या विशेष प्रयत्नातून कन्या विद्यामंदिर, कुंभोज या शाळेच्या सरंक्षण भिंतीसाठी व सुशोभिकरणा साठी गौण खजिन विभागातून १५ लाखाचानिधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून कन्या शाळा कुंभोज येथे संरक्षण भिंतीच्या काम करण्यात येणार आहे. त्या कामाचा शुभारंभ आज आमदार राजूबाबा आवळे सरपंच स्मिता चौगुले उपसरपंच अशोक आरगे ,महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी ,प्रकाश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले

 

 

यावेळी बोलताना आमदार राजूबाबा आवळे म्हणाले की, कुंभोज येथे गेल्या पाच वर्षात साडेतीन कोटी रुपये पेक्षा जास्त निधी विकास कामांसाठी दिला असून येणाऱ्या काळातील कुंभोज परिसरात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आता विधानसभा निवडणूक जाहीर होणार असून त्या निवडणुकीत आपण सर्वांनी मला सहकार्य करावे असे आव्हानही त्यावेळी त्यांनी केले.
यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव महापुरे, दावीत घाडगे ,आप्पासाहेब चौगुले, अनिकेत चौगुले ,भरत भोकरे शुभांगी माळी, माधुरी घोदे, सुदर्शन चौगुले, कोंडीबा भानुसे, धनाजी तिवडे ,कुबेर हराळे, नंदकुमार माळी तुषार कोळी ,डॉक्टर धर्मवीर पाटील, जहांगीर हजरत, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब डोणे, सुभाष पाटील, कॉन्ट्रॅक्टर अनिल अनुसे, लखन भोसले, विजय कोळी, मुनीर सुतार, प्रभाकर घोदे, राहुल कक्ते,अजीत देवमोरे,अमर बडंगर,आण्णा घोदे, त्रुतुराज तोरसकर, अभिनंदन चौगुले, प्रल्हाद लोखंडे उपस्थित होते. यावेळी आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते माजी उपसरपंच कुबेर हराळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कुंभोज व कन्या शाळा कुंभोज यांच्यावतीने आमदार राजूबाबा आवळे यांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.प सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाविकास आघाडी, कुंभोज व किरण माळी युवा शक्ती कुंभोज चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545