कोल्हापूर : कणेरीवाडी (ता. करवीर) या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गावामध्ये 91 लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने धनगर समाज मंदिर हॉल, बाजार कट्टा, गावांतर्गत रस्ते व गटर्स करणे आदी विकासकामांचा समावेश आहे.
यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सरिता खोत, सरपंच शामल खोत, माजी सरपंच शोभा खोत, उपसरपंच सीमा खोत, माजी उपसरपंच अजित मोरे, कणेरी सरपंच निशांत पाटील, पोलीस पाटील शिवाजीराव मोरे पाटील, आप्पासाहेब मोरे, सदाशिव म्हाकवे, विजयकुमार मोरे, संजय खोत, प्रकाश खोत, महादेव भोसले, सदस्य अरुण मोरे, विनोद खोत, महादेव वारके, सचिन खोत, वैभव पाटील, सुरेखा खोत, सुमन मोरे, राजश्री घोडके, मयुरी मोरे, रूपाली मोरे, संदीप शेळके, कृष्णात शेळके, महादेव शेळके, सागर शेळके, शिवाजी वाठारे, विनोद लाड, गुरव मामा, दिलीप चौगले, निखिल खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.