महादेव मंदिरामुळे बिद्रीच्या लौकिकात भर पडेल : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : आपल्या पंचवीस वर्षांच्या आमदार आणि मंत्रीपदाच्या काळात बिद्री गावाला विकासनिधी देताना आपण नेहमीच झुकते माप दिले आहे. त्यामुळे गावचा विकासात्मक कायापालट झाला आहे. गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाचे भव्यदिव्य मंदिर लवकरच पूर्णत्वास जाईल. या मंदिरामुळे गावच्या लौकिकात भर पडेल. बिद्री ता. कागल येथील श्री महादेव मंदिर व सांस्कृतिक हॉलसाठी १ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

 

 

मुश्रीफ म्हणाले, ‘आपल्या मतदारसंघात आठशेहून अधिक मंदिरे उभा केली याचे मला समाधान आहे. यामुळेच माझी ओळख राज्यभरात मंदिरवालेबाबा म्हणून झाली आहे. आपण केलेले सत्कार्य आणि जनतेचे प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी असून याच बळावर कोणतेही आव्हान परतवून लावण्याची शक्ती मला परमेश्वराने दिली आहे.

यावेळी बिद्रीचे संचालक मनोज फराकटे, रावसो खिल्लारी, माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, सरपंच पूजा पाटील, पांडुरंग पाटील, राजाराम चौगले, शिवाजी पाटील, पांडुरंग पाटील, गोपाळा पोवार, पांडुरंग चौगले, भाऊ पाटील, अनिल पाटील, नामदेव पाटील, तानाजी पाटील, राजेंद्र चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.