मुरगुड : मुश्रीफ फाउंडेशन च्या वतीने मुडगूड नगरपालिकेला ॲम्बुलन्स प्रदान करण्यात आली.
मुरगुड नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते चावी देऊन प्रदान करण्यात आली.
‘वैद्यकीय विषय आवडीचा असून आपण आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करीत आलो आहे. यापुढेही ती कायमपणे करीतच राहणार आहे.असे हसन मुश्रीफ म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील कुरुकलीकर, दिग्विजय पाटील, एड. सुधीर सावर्डेकर, अमर देवळे, नगरसेवक राहुल वंडकर, विश्वास चौगुले, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी, नामदेव भांदिगरे, रणजीत मगदूम, मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वळुंज आदी उपस्थित होते