वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या अकरा रोजी कोल्हापूर येथे मुलाखती- प्रमोद कदम

कुंभोज (विनोद शिंगे)

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि विधानसभा निवडणूक समन्वय समितीचे सदस्य सोमनाथ साळुंखे व राज्य कार्यकारिणी सदस्य व कोल्हापूर जिल्हा प्रभारी डॉ क्रांतीताई सावंत हे कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रमाचा भाग म्हणून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती करीता दौऱ्यावर येत आहेत.

 

सदर दौऱ्याच्या संदर्भात जिल्ह्यातील सर्व निवडणूक लढवणारे इच्छुक यांनी शुक्रवार दि 11 रोजी दुपारी 2 वाजता सर्किट हाऊस कोल्हापूर येथे उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन कोल्हापूर उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम  यांनी केले आहे.

🤙 8080365706