चंद्रदीप नरकेंच्या नेतृत्वाखाली कुंभी कासारी येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर:मा.आ.चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली
कुंभी-कासारी परिसरातील काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत  प्रवेश केला.

 

यशवंत बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक एकनाथ पाटील, आर.बी. खत कारखान्याचे माजी चेअरमन आनंदराव लहू पाटील, युवराज उर्फ बाळ पाटील (माजी सरपंच कुडित्रे), यशवंत बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील, यांच्यासह कुंभी-कासारी परिसरातील काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मफलर घालून मा.आ. चंद्रदीप नरके यांनी त्यांचे स्वागत केले.