राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द सरकारने दिला होता.
पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ₹2399 कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला.

 

आजपासून हे वितरण प्रारंभ झाले आहे. मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते.