डी. वाय. पाटील ग्रुपकडून कोल्हापूर महापालिकेला १५५० पथदिवे प्रदान

कोल्हापूर:डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला आज आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत १५५० पथदिवे प्रदान करण्यात आले. यावेळी कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. स्ट्रीट लाईट, ट्रॅफिक, पार्किंग आणि रस्त्यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे करताना काँग्रेसच्या पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.

यावेळी महापालिका काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्ष नेते राजेंद्र लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, तसेच सचिन चव्हाण यांच्यासह आजी- माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706