कसबा सांगाव येथील नेमिनाथ चौगले यांचा हसन मुश्रीफ गटात प्रवेश

कोल्हापूर : कसबा सांगाव ( ता. कागल ) येथील नेमिनाथ चौगले यांच्या घरी हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली. नेमिनाथ यांचा पक्षप्रवेश हा मुश्रीफ गटाला बळकटी देणारा आहे. ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. चौगले कुटूंबातील सर्वांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

 

यावेळी, माजी आमदार संजयबाबा घाडगे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, कागल नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, राजेंद्र माने, मानसिंग पाटील, माजी सरपंच रणजीत कांबळे, किरण पास्ते, अमोल माळी, मेहताब मुल्ला, बाळासो लोखंडे, दीपक गंगाई यांच्यासह कसबा सांगाव मधील इतर मान्यवर उपस्थित होते.