“नागरिकांचे आरोग्य, माझे ध्येय”: समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर: शाहू समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे हे एका खाजगी वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले , कागल मतदारसंघात आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा आजही उपलब्ध नाहीत, त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी जावे लागते. आपल्या मतदारसंघात या सुविधा उपलब्ध करणे, हे माझे ध्येय असून या अनुषंगाने मला काम करायचे आहे .

शाहू महाराजांची हि जन्मभूमी आहे ,शाहू महाराजांनी ज्या गोष्टीसाठी काम केलं त्यासाठी मला हि काम करायचं आहे . कागलकरांना आज हि उपचारासाठी पुणे मुंबई अशा शहरात जावे लागते . आरोग्य सेवेचा प्रश्न उपस्थित आहे तो सोडवण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. असे समरजितसिंह घाटगे म्हणाले