कोल्हापूर (सौरभ पाटील)
मंत्रालय येथे प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे बाबत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील माने , गौरव भाऊ नायकवडी, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद, वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना सांगली व कोल्हापूर जिल्हा यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी , वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसंपदा विभागाचे उपसचिव प्रवीण कोल्हे, उमेश कानडे प्रकल्पग्रस्त संघटनेचे समन्वयक हे उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यामध्ये पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नावाने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे बाबत अश्वाषित केले होते. त्यास अनुसरून यांनी दिनांक 8 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करणे बाबत निवेदन दिले होते. त्यास अनुसरून आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांसाठीचा आराखडा तयार करून येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.