देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड

मुंबई: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केली आहे. संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात शिरली. सचिवांसाठी असलेल्या गेट ने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ती महिला तिथून निघून गेली या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली, त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला सचिवांच्या गेटने सहजपणे आत मध्ये शिरली. त्यानंतर या महिलेने देवेंद्र फडणवीस यांची नेमप्लेट काढून फेकली आणि घोषणाबाजी केली. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.