ईडीपासून सुटकेसाठी ‘त्यांनी’ विश्वासाचा सौदा केला : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर: ईडीपासून ची सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालकमंत्री पदासाठी ‘त्यांनी’ विश्वासाचा सौदा केला. त्यामुळे त्यांना आता झोप येत नाही, वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून चुकीची वक्तव्य येत आहेत. अशी टीका शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना मुलासारखे प्रेम दिले तसेच खासदार सुप्रिया सुळे या मोठे भाऊ मानून त्यांना राखी बांधायच्या, परंतु या सर्वांच्या विश्वासाचा ‘त्यांनी’ सौदा केला आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या मंजुरी पत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. समरजितसिंह घाटगे म्हणाले, शरद पवार हे एखाद्या प्रवेशासाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कागलमध्ये आले, जयंत पाटील आले. सुप्रिया सुळे पुण्याच्या मेळाव्यात आल्या, मुंबईच्या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाडे ,आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे येत आहेत. हे सर्वच ‘त्यांना’खूपत आहे.

वडिलांसारख्या नेत्याबाबत जातीयवाद आरोप करणे योग्य आहे का? स्व. खासदार मंडलिक त्यांच्यामुळे जिल्हा बँकेत तुमची एन्ट्री झाली. त्यांच्या महालक्ष्मी दूध संघाच्या कर्जाच्या वसुलीसाठीचा बोर्ड त्यांच्या घरासमोर लावला. काय वेदना झाल्या असतील, हे स्वाभिमानी जनता विसरणार नाही. असे घाटगे यांनी सांगितले.

🤙 8080365706