कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता बेळगावी विमानतळ येथे आगमन व मोटारीने प्रयाण. स्वागत समारंभ (होसुर- कागणी – तेऊरवाडी) सकाळी 11.15 वाजता नेसरी चौक, ता. गडहिंग्लज येथे आगमन. सकाळी 11.15 वाजता सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम, मसनाई देवी मंदिर दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम, शहीद मेजर सत्यजित शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम. सकाळी 11.30 वाजता जनसन्मान यात्रा- लाडक्या बहिणींशी संवाद. (स्थळ: मसनाई मंदिर मैदान, ता. गडहिंग्लज) दुपारी 1 वाजता मुन्ना नायकवाडी यांचे निवासस्थान, आजरा रोड, नेसरी, ता. गडहिंग्लज येथे आगमन व दुपारी 2.55 वाजता बेळगावी विमानतळकडे प्रयाण.
