हणमंतवाडीतील एकाचा मारहाणीत मृत्यू

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. बाजीराव नरके (वय58) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बाजीराव नरके हे त्यांच्या पत्नीसह हणमंतवाडी येथे राहत होते. दोन दिवसापासून त्यांना मारहाण केली जात होती. यातून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये बुधवारी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नेमकी मारहाण कशामुळे झाली याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेल नव्हतं . रात्री उशिरा त्यांच्या नातेवाईकाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.