बारामती : बारामती येथे पक्ष कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली असती तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याचे दोन्ही हात बांधलेले दिसतात तसेच त्यांच्या चेहऱ्यावर काळे कापड देखील बांधला आहे. असे असताना आरोपीने पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावली असा प्रश्न निर्माण होतो. बदलापूर प्रकरणाची वेळीच एफ. आय. आर झाली नव्हती. ती का झाली नाही ? याची देखील चौकशी व्हायला पाहिजे तसेच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या सर्व समाजाची फसवणूक या सरकारने केली आहे. या अशा तीव्र शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.