मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होईल असे संकेत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर बैठका सुरू आहेत. यातच आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी या दोन्ही नेत्यामध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी राजकीय चर्चा केली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीवर हे दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधून असल्यास दिसून येत.