मुंबई : गणेशाचे विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दवी मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना विरार पूर्व तोटले तलावात आज बुधवार ( ता. १८) रोजी पहाटे घडली. पाण्यात फिट आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे .याबाबत विरार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमित सतीश मोहिते ( वय 24)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, विरार पूर्व फुलपाडा परिसरातील तो राहणार होता. पालिकेने या तरुणाला गणरायाचे विसर्जन करण्यासाठी हायर केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.अनंत चतुर्थीच्या निमित्ताने मंगळवारी गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला. आज पहाटे पर्येंत विसर्जन सुरू होते. यावेळी अचानक तरुणाला फिट आली आणि त्याचवेळी तो तलावात बुडाला. स्थानिक नागरिकांनी, पालिकेच्या अग्निशामन दलाचे जवानांनी त्याला बाहेर काढले असता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.