मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडवून घोषणाबाजी केली .

 धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नेत्याला घेराव घालत मराठा आरक्षणाची मागणी करण्याची मराठा आंदोलकांची पद्धत आजही कायम राहिली असून,धाराशिवच्या हातलाई मंगल कार्यालयात पक्षमेळाव्यासाठी मुख्यमंत्री आले असता,  त्यांना मराठा आंदोलकांनी अडवल्याचे दिसून आले. मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर घोषणाबाजी केली.

 

 

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूका तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न असा  मोठा चर्चेचा विषय झाला असून, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अडवण्यापासून सुरु झालेला नेत्यांच्या अडवाअडवीचा ट्रेंड मुख्यमंत्र्यांच्या धाराशिव दौऱ्यातही पहायला मिळाला.