डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश…

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजने साठी महिलांनी नामांकित बँकेचे खाते उघडले होते. या खात्याला चार्जेस रिकव्हर करून 3000 रुपये जमा होऊन त्याचे रिव्हर्स होऊन झिरो बॅलन्स खाते झालेले आहेत. हे पैसे चार्जेस कॅन्सल करून मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यावर जमा होण्यासाठी महिलांनी वेळोवेळी बँकेत जाऊन विनवणी करून विचारपूस करून अधिकाऱ्यांना दखल घेण्याची विनंती केली पण अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही.

 

 

याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडेयांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले ताबडतोब महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे. तसेच बँकेतील अधिकाऱ्यांनी उद्या सकाळ पर्यंत महिलांच्या बँक खात्यांवर पैसे जमा करू असे सांगितले.

🤙 9921334545