कोल्हापुरात भरधाव कारने सुरक्षारक्षकाला उडवले : सुरक्षारक्षक गंभीर जखमी

कोल्हापूर :  उचगाव (ता.करवीर) येथील घाडगे पाटील इंडस्ट्रीच्या समोर मागून येणाऱ्या भरधाव कारने कामावर जाणाऱ्या एका सुरक्षारक्षकाला हवेत उडवले. यामध्ये सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. रोहित सखाराम आप्पे (वय 24, रा. उचगाव ता. करवीर) असे अपघातग्रस्त तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर चारचाकी चालक पसार झाला आहे.

 

 

रोहित हा खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. दि. 28 रोजी साडेबाराच्या सुमारास तो नोकरीसाठी जात होता. रोहित घाडगे पाटील इंडस्ट्री समोर आला असता चारचाकी ने त्याला जोराची धडक देत हवेत उडवले. गंभीर जखमी झालेल्या रोहितवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

🤙 9921334545