महाराष्ट्र राज्य सरकारचे विरोधात निषेध सभा-जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

सिंधुदुर्गमध्ये किल्ले राजकोट येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळला आहे.ही घटना अतिशय वेदनादायक व निंदनीय असून या घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव साहेब व कोल्हापूर जिल्हासंपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या उपस्थितीमध्ये हातकणंगले येथे रविवार दिनांक 01 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता राज्यसरकार विरोधात निषेध नोंदविण्यात`येणार आहे.

 

 

तरी हातकणंगले विधानसभा मतदार संघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना तसेच इतर अंगीकृत संघटनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे._असे आपण उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केले आहे.

🤙 9921334545