कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे राष्ट्रीय क्रिडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मान अभिमान फाउंडेशन व कालीरमण फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये ब्रिलियंट स्कुलस् नरंदेचे क्रिडा प्रशिक्षक व कुस्तीच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संग्राहक नेमिनाथ मगदुम यांना ऑलंपिकवीर क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याचबरोबर ब्रिलियंट स्कूलचा कुस्तीपटू जयदीप सूर्यवंशी व कराटे खेळाडु रोहन ढोबळे यांनाही ऑलम्पिकवीर राष्ट्रीय क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्कुलच्या हर्षित जगताप, सार्थक भोईटे, आदित्य गोसावी, आयुष भोर, श्रवण कदम, रितेश चव्हाण, आर्यन नागरगोजे, कृष्णा कारंडे या विद्यार्थ्यांना विविध खेळात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना देण्यात येणारा मेजर ध्यानचंद क्रिडारत्न पुरस्काराने हिंद केसरी, भारत केसरी पैलवान दिनानाथ सिंह व 1964 च्या ऑलम्पिक स्पर्धचे नेतृत्व केलेले पैलवान बंडामामा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सर्वच विद्यार्थ्यांना ब्रिलियंट स्कुलस् नरंदेचे संस्थापक अध्यक्ष नितिन पाटील सर, मुख्याध्यापिका शुभांगी पाटील , अधिक्षक किरण थोरात, कार्याध्यक्ष संजयसिंह पाटील, सर्व शिक्षक स्टाफ व पालकांचे प्रोस्ताहन लाभले.