मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनीत एका अल्पवयीन मुलाने चालवलेल्या भरधाव SUV ने एका युवकाला उडवलं. या अपघातात दूध पुरवठा करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे चार च्या सुमारास घडली.
मिळालेली माहिती अशी,चुकीच्या बाजूने आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने दूध पुरवठा करणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात नवीन वैष्णव (24) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी हा 17 वर्षाचा अल्पवयीन असून ,SUVचे मालक इकबाल जिवाणी (48)आणि त्यांचा मुलगा मोहम्मद फज इक्बाल जिवाणी (21)यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडक दिल्यानंतर ही कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. अपघात झाल्यानंतर अल्पवयीन चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो जखमी झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.