कोल्हापुरातील महिलांची मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला राखी बांधून रक्षाबंधन साजरी ;

कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील

राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे या योजनेत पात्र होत असलेल्या महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास रक्षाबंधन पूर्वीच सुरवात झाली आहे.

त्यामुळे सर्वच महिलांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दिलेल्या शब्द पाळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधून लाडक्या भावाप्रती भावना व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन दिवशी “शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ” येथे एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला राखी बांधण्यात आली. .