नाशिक मध्ये बालकाचा संशयितरित्या मृतदेह आढळला

नाशिक :     नाशिक मधून खळबळजनक बातमी समोर आली आहे .एका चिमुकल्याचा संशयितरित्या मृतदेह झुडपामध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .नाशिकच्या चांदवड मध्ये ही घटना असून याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून ,अधिक तपास सुरू असल्याची पोलिसांनी सांगितले.

एक सात वर्षीय मुलगा गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होता .चांदवडच्या वडनेरभैरव मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तपासादरम्यान चिमुकला एका अनोळखी तरुणांसोबत जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आली. त्या आधारे आता पोलिसांनी त्या संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

🤙 9921334545