४१ औषधे होणार स्वस्त : नागरिकांना मोठा दिलासा

भारत सरकारने भारतातील काही महत्वपूर्ण आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने ४१ औषधांच्या आणि ६ फॉर्म्युलेशनच्या किंमती निश्चित केल्या आहेत.

मधुमेह, अंगदुखी, हृदय, यकृत, अँटासिड, अ‍ॅलर्जी, मल्टिव्हिटॅमिन, अँटीबायोटिक्स इत्यादी किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे, आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या किंमती निश्चित केल्यामुळे ४१ औषधे स्वस्त होणार आहेत. यामुळे आता नागरिकांना या सगळ्या आजारांवरील औषधांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

औषधांच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय हा नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या १४३ व्या (NPPA) बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठी राजपत्रित अधिसूचना जारी करण्यात आली आहे. NPPA ही एक सरकारी नियामक संस्था असून जी भारतातील फार्मास्युटिकल औषधांच्या किंमती नियंत्रित करण्याचे काम करते.

🤙 9921334545