कोल्हापूरसाठी आता स्वत:चा हवाई मार्ग

कोल्हापूर : कोल्हापूरसाठी आता स्वत:चा हवाई मार्ग मिळणार आहे. याकरिता ‘डीव्हीओआर’ (डॉपलर व्हीएचएफ ओमनीडायरेक्शन रेंज) ही प्रणाली विमानतळावर बसविण्यात येत आहे. 15 मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

त्याचबरोबर ‘आरएमपी’ या उपग्रहावर आधारित दिशादर्शक प्रणालीला मान्यता मिळाली असून, ती 13 जूनच्या मध्यरात्रीपासून कार्यान्वित होणार आहे. या दोन्ही प्रणालींमुळे विमान प्रवास अधिक सुरक्षित होणार असून, यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. परिणामी, कोल्हापूरची विमानसेवा विस्तारण्यासाठीही याचा मोठा फायदा होणार आहे.

कोल्हापूर विमानतळावर ‘डीव्हीओआर’ आणि ‘डीएमई’ प्रणाली बसविण्यात येत आहेत. हे काम 15 मेपर्यंत पूर्ण होईल. यानंतर महिना-दोन महिन्यांत ही प्रणाली प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. कोल्हापूर विमानतळासाठी ‘आरएमपी’ (रिक्वायर्ड नेव्हिगेशन परफॉर्मस) या सॅटेलाईटवर आधारित प्रणालीला सलग दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे. या प्रणालीनुसार कोल्हापूरसाठी स्वतंत्र चॅनेल क्रमांक निश्चित झाला असून, त्यानुसार कोल्हापूरसाठी ‘इन्स्ट्रूमेंटल अ‍ॅप्रोच चार्ट’ तयार झाला आहे. यामुळे कमी द़ृश्यमानतेतही विमानतळावर सुरक्षित लँडिंग करता येणार आहे. याखेरीज ‘आयएलएस’ (इन्स्ट्रूमेंटल लँडिंग सिस्टीम) प्रणालीलाही कोल्हापूरसाठी मान्यता देण्यात आली आहे.

डीव्हीओआर’ ही आधुनिक दिशादर्शक प्रणाली आहे.  तर ‘डीएमई’ म्हणजे ‘डिस्टन्स मेजरिंग इक्विपमेंट.’ याद्वारे धावपट्टीचे नेमके अंतर समजण्यास पायलटला मदत होते.

🤙 9921334545