कोल्हापुरात अमित शहांच्या नेत्यांना सूचना

जरी जाहीर प्रचार रविवारी संपत असला तरीही ७ मे रोजी सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत कामात रहा. कोणत्याही परिस्थितीत सकाळी मतदान करवून घ्या अशा सूचना भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार आणि प्रमुख नेत्यांना दिल्या .

केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान करवीर निवासानी अंबाबाईचे दर्शन घेतले. सकाळी दहा नंतर शहा थांबलेल्या हॉटेलवर खासदार धनंजय महाडिक आले . महाडिक आणि शहा यांनी चर्चा केली आणि संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना बोलावून घेतले. यावेळी भाजप नेते समरजितसिंह घाटगे हजर होते . या चौघांशीही शहा यांनी सविस्तर चर्चा करून सूचना दिल्या. दोन्ही मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेतानाच नरेंद्र मोदी ,योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा परिणाम आणि नितीन गडकरी यांच्या दौऱ्याचीही माहिती त्यांनी दिली .