देशासाठी नरेंद्र मोदींसारखेच सक्षम नेतृत्व असणे गरजेचे असल्याचे सांगून खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिकाने निवडून लोकसभेत पाठवूया असे आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील संकल्य सिद्धी हॉल मध्ये आयोजित केलेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलत होते.
प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेना पुष्प अर्पन करून मेळाव्याला सुरवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाची महायुती केली आहे.असे प्रतिपादन विद्यमान खासदार धैयेशील माने यांनी व्यक्त केले. विरोधकांनी कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरून प्रवास करावा म्हणजे खासदारांनी केलेली कामे दिसतील. शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यासाठी एम आय डी सी मंजुर केली आहे.
विकासाचा संकल्प राबविण्या साठी महायुतीला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. देशातील भष्ट्राचारी लोक एकत्र येवून दरोडेखोरांची महाविकास आघाडी एकत्र आली आहे त्या आघाडीला गाडण्यासाठी नरेंद्र मोदीचे गॅरंटी कार्ड वाढवा व शाहूवाडी च्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील यांना मोठ्या मतधिक्याने निवडून देण्याचे आवाहन इंचलकरंजीचे माजी मंत्री सुरेश हाळवणकर यांनी केले.
यावेळी सत्यजित देशमुख,माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील,राजवर्धन निंबाळकर,अमरसिंह भोसले,डॉ स्वाती पाटील,मधुकर लाड,शहाजी भोसले,आबा वग्रे ,माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यांची भाषणे झाली. मेळाव्यात शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देसाई, मनसेचे युवराज काटकर ,विजय रेडेकर,दाजी चौगुले,रंगराव खोपडे,सुषमा पाटील,अजितसिह काटकर,दिलीप पाटील,पांडुरंग निकम,डॉ पंचरत्न कांबळे,राजेंद्र पाटील, अभिषेक पाटील