इचलकरंजी शहरात माने वहिनींचा धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा झंजावात फटाके फोडून केले स्वागत

इचलकरंजी:
पुत्र धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने इचलकरंजी झंजावात प्रचार सुरू केला आहे. शहरात विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून फटाके फोडत स्वागत केले. विशेष म्हणजे मारवाडी समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती. श्रीकांत मंत्री प्रल्हादजी भुतडा, संजय लाहोटी, राजू लाहोटी, श्रीवल्लभ बांगड आदींनी त्यांचे स्वागत करत मारवाडी समाजाचा शंभर टक्के पाठिंबा असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी हिंदुराव शेळके सनी खारगे, तांबे माळ मधील बोने पाटील, वसंत कॉलनी आदी परिसरात गाठीभेटी घेतल्या. माजी नगरसेवक मोहन कुंभार व परिसरातील महिलांच्या गाठीभेटी घेऊन विचारपूस केली यावेळी आमचं मत दादांनाच असे आश्वासन महिलांनी दिले.

यावेळी निवेदिता माने म्हणाल्या, इचलकरंजीकरांनी माने कुटुंबावर भरभरून प्रेम केलेल आहे. त्यांचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब माने यांना पाच वेळा, मला दोन वेळा आणि धैर्यशीलला एक वेळ असं सातत्याने आठ वेळा निवडून देऊन माने घराण्यावर प्रेम केलेले आहे. यापुढेही असेच प्रेम राहावे. असे आवाहन केले.
त्यांच्यासोबत उपमहाराष्ट्र केसरी भाजपचे शहराध्यक्ष अमृत मामा भोसले, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, रवी लोहार, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे आदी उपस्थित होते.