सांगली लोकसभेनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीत वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केल्यानतंर आता तेथील स्थानिक कॉंग्रेस नेत्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पैशावाल्यांना उमेदवारी दिली आम्ही काय फक्त कामं करायची का, असा सवाल करत आता हायकमांडकडून जरी आदेश आला तरी देखील निवडणूकीत काम करणार नाही, सर्वजण राजीनामा देऊ, अशी भूमिका कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मांडली.