शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संयोगिताराजे छत्रपतीनी शहरातील गल्ली-बोळात जाऊन नागरिकांशी साधला थेट संवाद

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा आठवडाभर झंझावती दौरा सुरु आहे. शुक्रवारपासून त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहर परिसरातील भागात प्रचार दौरा केला. टेंबलाई परिसरातील कृष्ण विहार कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, भीम ग्रुप, हनुमान मंदिर परिसर, श्रीराम कॉलनी, साईनाथ कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, जोशी गल्ली विक्रमनगर येथील कॉलनी, गल्ली, बोळात जाऊन तेथील नागरिक, महिलांशी थेट संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिक, महिलां यांच्याशी त्यांनी संवाद साधत शाहू महाराजांना निवडून देण्याचे आवाहन केले.

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा मनमोकळा संवाद, थेटपणे जनतेत मिसळणे, उपस्थित महिलांशी कुटुंबातील व्यक्तिप्रमाणे चर्चा करणे, विचारपूस करणे, अडीअडचणी समजून घेणे यामुळे नागरिक व महिलांनी प्रभावित होऊन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या जनतेप्रति असलेल्या आपलुकीचे विशेष कौतुक केले. छत्रपती घराण्याच्या सून आमच्या गल्ली – बोळात येऊन आपल्याच घरातील व्यक्तीप्रमाणे मिसळत आहेत हे पाहून महिला भारावून जात होत्या.

यावेळी छत्रपती घराण्याने जपलेला घरोबा पाहून सर्व महिलांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती ताराराणी महाराज यांच्याविषयी नितांत आदर आहेत. छत्रपती घराण्याविषयी, विद्यमान शाहू महाराजांबद्दल प्रचंड स्नेह आहे. त्यामुळे या निवडणुकीत
आम्ही आमच्या छत्रपती घराण्यासाठी, शाहू महाराजांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगून शाहू महाराजांचा विजयाच्या घोषणा दिल्या.

दौऱ्यात माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, शिवसेना उपशशहर प्रमुख राजेंद्र पाटील, सागर पाटील, ओंकार मगदूम, विजय पाटील, सारिका पवार, तुकाराम इके, सुमन पवार, ललिता रेडेकर, शशिकला पाटील शकुंतला पवार, विनय क्षीरसागर,(कृष्ण विहार कॉलनी), अशोक चौगले, सम्राट डोंगरे, अभिजित क्षीरसागर, सुनील माने, अनिता चौगले, लता डोंगरे, सुवर्णा पाटील ( लक्ष्मी कॉलनी), भटक्या जमाती उपाध्यक्ष बबन कावडे, कृष्णात शिंदे, महीपती महेकर, संपता कृष्णा कांबळे, उज्ज्वला अशोक कांबळे, संगीता कांबळे, सर्जेराव कांबळे, योगेश आजाटे, मनोहर पाटील, ( भीम ग्रुप, हनुमान मंदिर परिसर ), रामचंद्र घरपणकर, शोभा पाटील, संगीता पाटील, सविता शिंदे, राणी कदम, दिगंबर पाटील, किशोर कदम, प्रसाद घरपणकर (श्रीराम कॉलनी, साईनाथ कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, जोशी गल्ली विक्रमनगर), अजित लोखंडे, धोंडीराम घाटगे, विजय घाटगे, आनंद पोवार ( एबीएस तालीम) आदीसह नागरिक, महिला, युवक, युवती, कार्यकर्ते उपस्थित होते.