आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणुन घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

तूळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.