श्री बालवीर तरुण मंडळाचे वतीने बालिंगे गावांमध्ये शिवजयंती साजरी

बालिंगा: तालुका करवीर येथील मुख्य चौकामध्ये श्री बालविर तरुण मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

संयोजक रघुनाथ कांबळे कोतवाल हे होते .छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस रघुनाथ कांबळे कोतवाल,अजित कांबळे, भीमराव कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला तर जमलेल्या सर्वांनी गोविंदराव पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित लोक विजय जाधव ,श्रीकांत निगडे, सुखदेव कांबळे, अशोक चव्हाण, मोहन कांबळे, बाळासो कांबळे ,अनिल पोवार ,उत्तम कांबळे, कौशल कांबळे व मंडळाचे कार्यकर्ते हजर होते.

🤙 8080365706