मुझफ्फरनगर टाइम बॉटल बॉम्ब: मुख्य सूत्रधार इमराना अटकेत

नवी दिल्ली : मुझफ्फरनगरमध्ये टाइम बॉटल बॉम्ब बनवणाऱ्या जावेदच्या अटकेनंतर पोलिसांनी एसटीएफच्या साहाय्याने मुख्य सूत्रधार इमराना हिला अटक केली आहे. असुन तिची चौकशी सुरु आहे.

एसटीएफनंतर दिल्लीची आयबी टीमही इमरानाची चौकशी करत आहे.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात असे उघड झाले आहे की, इमराना १५ वर्षांपूर्वीपर्यंत भट्टीवर मजूर म्हणून काम करत होती, आज तिच्याकडे अनेक घरे आणि प्लॉट आहेत. याशिवाय ती महागड्या कारमधूनही प्रवास करते.एकीकडे तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचा शोध पोलीस घेत आहेत. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा सीएए लागू करण्याची घोषणा केली जाईल, तेव्हा तो बॉम्ब वापरता यावा यासाठी त्यांनी बॉम्ब बनवले असल्याचे समोर आले आहे. इमरानाने दिल्लीतील कोणाच्या तरी सांगण्यावरून असा आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अधिक माहिती मिळेल.इमरानाच्या अटकेनंतर उत्तर प्रदेश पोलीसांचे एसटीएफ आता तिच्या नेटवर्कची माहिती गोळा करत आहे. इमरानामागे कोणत्या संघटना आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय इमराना आणि जावेद एकमेकांच्या संपर्कात कसे आले,ह्याचा ही तपास सुरु आहे.

🤙 8080365706