कागल : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प विकसित भारताचे स्वप्न साकार करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिला, गरीब, शेतकरी, युवक यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. विकासाला गती देणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये रोजगार वाढीस चालना मिळणार आहे.
पायाभुत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून,कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्यामुळे यामुळे सर्वांनाच दिलासा मिळणार आहे. गरिबांचे कल्याण हेच देशाचे कल्याण हा महत्त्वपूर्ण नारा घेतलेल्या अर्थसंकल्पात रू 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवठा करण्याची महत्त्वाची योजना स्वागताहार्य व कौतुकास्पद आहे.असे मत शाहू ग्रुपचे राजे समरजीत सिंह घाटगे यांनी व्यक्त केलं आहे.